मॅग्नस कार्लसन विश्वविजेता, भारताच्या प्रज्ञानानंदचा पराभव

Chess World Cup Final 2023 – आज (24 ऑगस्ट) बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यामध्ये भारताच्या आर. प्रज्ञानानंदचा (R. Praggnanandhaa) पराभव झाला असून मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) हा विजेता ठरला आहे. प्रज्ञानानंदला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्यांदाच कार्लसननं वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. प्रज्ञानानंद आणि कार्लसन या दोघांनीही 25 मिनिटाच्या पहिल्या गेममध्ये आपला वजीर गमावला होता. त्यानंतर प्रज्ञानानंद 19 मिनिटांपर्यंत पोहचला होता तर कार्लसन 14 मिनिटांपर्यंत पोहचला होता. तर कार्लसन हा पिछाडीवर गेला होता. कार्लसननं पहिला टाय ब्रेकर सामना जिंकला होता. तसंच प्रज्ञानानंदला दुसरा सामना जिंकायचा होता. पण प्रज्ञानानंदच्या हातून वेळ निसटून चालली होती आणि कार्लसननं पहिला रॅपिड गेम जिंकला.
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत प्रज्ञानानंद उपविजेता ठरला आहे. यानंतर फिडेने एक ट्विट केलं आहे. 18 वर्षीय भारतीय खेळाडूचे एका प्रभावी स्पर्धेसाठी अभिनंदन. प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत जाताना हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारूआना यांचा पराभव केला. त्याचा फायनलपर्यंतचा प्रवास दमदार होता. तसंच प्रज्ञानानंदने FIDE चे तिकीटही मिळवले, असं ट्विट फिडेने केलं आहे.