ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

…अन्यथा चित्रपटगृह पेटवून द्या; ‘पठाण’मधील आक्षपार्ह चित्रकरणावर अयोध्यातील महंतांचा थेट इशारा,

अयोध्या : (Mahant Rajudas On Shahrukh Khan) अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आहे. मात्र या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्याविरुद्ध अयोध्येतील महतांनी थेट सिनेमागृह पेटविण्याच धमकी दिली आहे. त्यामुळे शाहरुखच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वकील विनीत जिंदाल यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले. दुसरीकडे, अयोध्येचे हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले. “मी लोकांना आवाहन करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, अशा चित्रपटगृहांना आग लावावी,” असे महंत यांनी एका व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे, लाईव्हहिंदुस्तानने याबाबत वृत्त दिलं आहे.

अयोध्याचे महंत राजू दास यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, हे गाणं हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे. शाहरुख खानने हिंदू धर्माचा अनेकदा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “बॉलिवूड आणि हॉलिवूड नेहमीच सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. दीपिका पदुकोनने ज्या पद्धतीने भगव्या बिकिनीचा वापर केला आहे, ते अत्यंत निंदणीय आहे. मी लोकांना या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो. ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाईल ती चित्रपटगृहे जाळून टाका अन्यथा त्यांना समजणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये