ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; ‘या’ दिवशी होणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई | Maharashtra Political Crisis – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. आज (1 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं आहे. दोन्ही बाजूने कोणते मुद्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

नेमकं काय घडलं आज कोर्टात?

सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असं घटनापीठानं म्हटलं आहे. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील या बाजू मांडू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. हे मुद्दे मोजकेच असावेत असंही कोर्टानं म्हटलं आहे.

पुढे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, दोन्ही बाजूने कोणत्या मुद्द्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे देखील निश्चित करायचं आहे. जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाहीत. लिखित स्वरूपात मुद्दे दिल्यानं घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये