ताज्या बातम्यामुंबई

मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. या निवडणूकीत जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे, यासाठी महामुंबई मेट्रोकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) २० नोव्हेंबरला मेट्रो सेवेची वेळ वाढवली आहे. मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना सहज आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या विस्तारित सेवांचा उद्देश आहे.

मतदानाच्या दिवशी प्रवासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोसेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होतील आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. २० नोव्हेंबरला पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर शेवटची मेट्रो २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे २१ नोव्हेंबरला १ वाजता सुटेल. एकूण १९ अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण दैनिक फेऱ्या २४३ वरून २६२ फेऱ्यांपर्यंत वाढतील. नियमित सेवा सकाळी ०५:२२ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंतचा आणि परतीचा प्रवास सुलभ करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देत मतदारांचा अधिक मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

विशेष वाढीव वेळा

  • सकाळच्या सेवा : ०४:०० वाजता ०५:२२ वाजता
  • रात्री उशिराच्या सेवा : रात्री ११ वाजता मध्यरात्री १ वाजता
  • या वाढीव वेळेत मेट्रो दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये