ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुक्ता टिळक यांना देवेंद्र फडणवीसांनी अर्पण केली श्रद्धांजली, म्हणाले…

पुणे : (Devendra Fadnavis On Mukta Tilak) पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार आणि पुण्यनगरीच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे आज (गुरुवार) दि. 22 रोजी निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शोक व्यक्त केला आहे.

फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या (BJP) ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा प्रकारची श्रध्दांजली त्यांनी अर्पण केली.

पुढे ते म्हणाले, मुक्ताताई पुण्याच्या माजी महापौर सुद्धा होत्या. त्यांनी अनेक विकास कामात मोठे योगदान दिले. पक्षाबद्दल त्यांची प्रतिबद्धता ही अवर्णनीय अशीच होती.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये