भारत-पाक हायव्होल्टेज सामना ‘या’ चॅनेलवर पाहता येणार विनामुल्य!

मुंबई : (Watch India-Pakistan match for free) सध्या सुरु असलेल्या आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ एका आठवड्यात दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. मागिल सामन्यात हवेत असणाऱ्या पाकिस्तानला भारताने पराभवाची धुळ चारत वस्त्रहरण केलं. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता पाकिस्तानही सर्वस्व पणाला लावणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच धमाकेदार होणार आहे.
दरम्यान, रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर खेळाला जाणारा हा रंगतदार सामना आता तुम्हाला मोफत पहाता येणार आहे. आतापर्यंत तुम्ही भारत-पाक पैसे खर्चून सामना स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर किंवा हाॅटस्टारवर पाहिला असेल. मात्र, आता तुम्हाला हा सामना फ्रिमध्ये पाहण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.
भारत-पाक सामना एकही पैसा न खर्च करता तुम्ही डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर पाहू शकता. हे चॅनेल फ्रि असून यावर आपण सामन्याचा आनंद घेऊ शकता. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान दुसऱ्यांदा भारताशी भिडणार आहे. त्याचे कारण म्हणजे, हाॅंगकाॅंग संघावर धमकेादार विजय मिळवल्यामुळे त्यांना हि संधी मिळाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना एका आठवड्यात पुन्हा एकदा भारत-पाक हायव्होल्टेज सामना पहाण्याचा आनंद घेता येणार आहे.