देश - विदेश

रत्नागिरीत ठाकरे गटाचा डंका, शिंदे गटानं खातं उघडलं

रत्नागिरी | Maharashtra Grampanchayat Election Result 2022 – 18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. तसंच आज (20 डिसेंबर) या ग्रामपंचायतींचा निकाल आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

रत्नागिरीत ठाकरे गटानं बाजी मारली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं खातं उघडलं आहे. रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला असून सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी झाल्या आहेत. हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ आहे.

एकूण ग्रामपंचायत- 222

बिनविरोध – 66

शिवसेना – 37

शिंदे गट – 09

भाजप- 05

राष्ट्रवादी- 02

काँग्रेस- 00

इतर-13

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये