“असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितलेला नाही, आहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार”

मुंबई :Kirit Somaiya On Uddhav Thackaray| महाराष्ट्रात आता ईडीचे छापे अनेक नेते मंडळींच्या घरावर पडत आहेत. यातच शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांची काल तब्ब्ल १४ तास ईडीने (ED) चौकशी केली आहे. ईडीने दापोली येथील सदानंद कदम (Sadanand Kadam) यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. असल्याचा दावा अनिल परब यांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना केला आहे. परब यांच्या ईडी चौकशीमुळे शिवसेना आणि भाजप(BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात जोरदार टीका सुरु आहेत. त्यातच सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर टीका करतं थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackaray) निशाणा साधत म्हटलं की, आतापर्यंत ”असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितलेला नाही, आहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार” याआधी देखील उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केलं. अनिल परबही (Anil Parab) त्याच माळेतले मनी आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि अनिल परब यांना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल,” अशा शब्दांत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल परब हे तो मी नव्हतेच या नाटकाप्रमाणे वागत आहेत. ‘तो मी नव्हेच’ या नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एखादा माणूस किती नाटकी करू शकतो हे सर्वांच मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिल आहे. जर परब माझा काहीच त्या रिसॉर्टशी सबंध नाही म्हणतं असतील तर त्यांनी माझ्या १२ मुद्द्यांची उत्तरं द्यावीत असा प्रश्न सुद्धा सोमय्यांनी उपस्थित केला आहे.