Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, बसवराज बोम्मई उद्या गृहमंत्र्यांच्या भेटीला, सीमावादावर तोडगा निघणार?

मुंबई : (Maharashtra Karnataka Border Dispute CM Eknath Shinde, Devendra Fadanvis, Basavraj Bommai Visiting Amit Shah) महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाने (Maharashtra Karnataka Border Dispute) पुन्हा तोंड वर काढलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavraj Bommai) यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चाळीस गावं कर्नाटकात येणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून महाराष्ट्रात संतप्त वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी आणि तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. (Mahavikas Aghadi On Karnataka Maharashtra Border Dispute)

दरम्यान, उद्या (१४ डिसेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला जाणार आहेत. (CM Eknath Shinde, Devendra Fadanvis Visiting Amit Shah In Delhi) गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीला कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखीलं उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र – कर्नाटक सिमाप्रशानावर काही तोडगा निघतो का? याकडे महाराष्ट्रातील नागरिकांचं लक्ष आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात येणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला होता. महाराष्ट्रातील एकही गावं कर्नाटकात जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला होता. त्याचबरोबर कर्नाटकातील काही मराठी भाषिक गावं राज्यात परत आणण्यासाठी आम्ही प्त्रायात्न करणार आहोत असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, गुजरात निवडणुकींसाठी भाजपने महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळवले आणि आता कर्नाटकात सरकार यावं यासाठी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात घेऊन जाण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणावर पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे, हा वाद सुटेल अशी अशा राज्यातील लोकांना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये