अजित पवारांबाबतच्या चर्चांवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “फाटे फोडण्याचा…”
मुंबई | Sharad Pawar On Ajit Pawar – सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगताना दिसत आहे. ती म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची. तसंच न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार आहे. त्यामुळे आता या 40 आमदारांसह अजित पवार बंड करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व राजकीय चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “अजित पवारांबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे, ती केवळ माध्यमांच्या मनात आहे. अशी चर्चा आमच्या कुणाच्याही मनात नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी पक्षाला अधिक शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत.”
“मी वर्तमानपत्रात वाचलं की आज आमदारांची बैठक वगैरे आहे. ही गोष्ट 100 टक्के खोटी आहे. अशी कोणतीही बैठक होणार नाही. सध्या पक्षाचे प्रांताध्यक्ष हे कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवार देखील याच कामात व्यस्त आहेत. तसंच या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी बाकी कुणावरही नाही. मी माझे सर्व ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतो. त्यामुळे मी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही”, असंही शरद पवारांनी सांगितलं.