“महाराष्ट्र लवकरच सात ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल”
मुंबई | महाराष्ट्रात लवकरच सात ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कौतुक केलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगती करत राहिलो, तर आपण लवकरच 7 ट्रिलियन अर्थव्यवस्था होऊ शकते, असा विश्वास देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 2015 मध्ये 2030 पर्यंत ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प आम्ही पुढे नेणार असल्याचंही ते म्हणाले.
”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारे मॉडेल घेऊन येणार आहे. हे मॉडेल सर्वसमावेशक असेल.” तसंच आम्ही राज्यातील पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प सुरू केले असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.