ताज्या बातम्या
महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना त्यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील राजघाटावर आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही यावेळी पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत मी त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राजघाटावर आदरांजली वाहिली त्याचबरोबर अनेक नेत्यांनी आदरांजली वाहिली.