अखेर काँग्रेस अध्यक्ष बदल झाला! मल्लिकार्जुन खर्गे नवे ‘सरसेनापती’! भाजपचं आव्हान पेलणार का?

नवी दिल्ली : (Mallikarjun Kharge Congress new president) देशातील 137 वर्षाच्या सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अखेर ‘सरसेनापती’ मिळाला आहे. मलिकार्जुन खर्गे आणि शशीर शरुर यांच्या अध्यक्ष पदासाठी सामना झाला. यामध्ये ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी 9 हजार 800 जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना 7 हजार 897 मते पडली. विरोधी शशीर थरुर यांना 1072 हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्ष 137 वर्षांच्या इतिहासात सर्वांत वाईट कालखंडातून जात आहे. पक्षासमोर 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपचं तगडे आव्हान आहे.
काँग्रेसमध्ये नव्याने जाण फुंकण्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी पदभ्रमंती करत आहेत. या यात्रेने आत्तापर्यंत 42 दिवसांत 1 हजार किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता तोच प्रतिसाद पक्षाला सक्रीय करून 2024 पर्यंत कायम ठेवण्याचे तगडे आव्हान खर्गे यांच्यासमोर असेल.