२०२४ साठी ममता बॅनर्जींनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा; म्हणाल्या, “आता मी, नितीश कुमार आणि…”

भाजपला सध्या कट्टर विरोधक न राहिल्याचं देशात चित्र आहे. भाजप लहान प्रादेशिक आणि विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप देखील करण्यात येत आहेत. अशातच येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी विरोधी पक्ष आत्तापासूनच मैदानात उतरल्याचे दिसत आहेत.
एकीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे ‘जोडो भारत’ यात्रेवर रवाना झालेले आहेत. तर आपचे अरविंद केजरीवाल देखील मोठ्या प्रमाणात लोकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे देशात तिसरी आघाडी स्थापन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
“आता मी, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि हेमंत सोरेन सर्वजन सोबत आलेलो आहोत. त्यामुळे लोकसभेत ३०० जागा निवडून आणण्याची भाषा करणाऱ्यांना ५ राज्यांमध्ये १०० जागांवर पराभव स्वीकारावा लागणार आहे. केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवणाऱ्यांना आमचे जनतेचे सरकार धडा शिकवेल” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.