दाक्षिणात्य चव आणि मराठी संस्कृतीला जोडणारा ‘मानकर डोसा’

सध्या पुण्यात सर्वाधिक लोकप्रिय खाद्य म्हणजे ‘डोसा’च समजलं जातं. हेल्दी फूड म्हणून लोक डोसा आवडीनं खातात. मात्र दाक्षिणात्य खाद्य असलेला डोसा पुण्यात एवढा लोकप्रिय होण्यामागे मुख्य कारण ठरला आहे १९८६ मध्ये सुरू झालेला ‘मानकर डोसा.’ हॉटेलमध्ये काम करून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रीकांत मानकर यांनी १९८६ मध्ये सातारा रोडवर हातगाडीवर डोसा आणि उत्तप्पा विकण्याचा एक किरकोळ व्यवसाय सुरू केला होता. जबरदस्त मसालेदार चवीमुळे ‘मानकर डोसा’ काही काळातच लोकांच्या प्रथम प्राधान्याचा बनला. पुण्यातील अनेक ठिकाणांहून सातारा रोडला डोसा खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि मालकांना मानकर डोसाचा विस्तार करावा लागला. सध्या पुणे आणि पुण्याबाहेर तब्बल ३० शाखा खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. सध्या ‘मानकर डोसा’चा कार्यभार धीरज मानकर आणि संतोष मोरे बघतात.
बाजारातदेखील मानकर डोसाचा ट्रेडमार्क असणारा डोसा आणि चटणी उपलब्ध आहेत. केळीच्या पानावर वाढल्या जाणार्या मानकर डोसा महाराष्ट्राची संस्कृती धरून पुढे जात आहे. ३० शाखांमध्ये एकच चव, अनेक प्रकारचे डोसा, उत्तप्पा आणि अनोख्या जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे मसाले, चटणी यांमुळे मानकर डोसा लोकांच्या मनात घर करून बसला आहे. “चवीचा आणि सेवेचा उत्तम दर्जा देत राहिल्याने ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या उत्तुंग प्रतिसादामुळे आम्ही महाराष्ट्रभरात लोकप्रिय होत आहोत. दक्षिण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या चवीचे डोसे मिळतात. त्या संपूर्ण चवी एकाच ठिकाणी मराठी माणसांसाठी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्हाला असाच प्रतिसाद मिळत राहील, याचा विश्वास आहे,” असं धीरज मानकर व संतोष मोरे सांगतात.