चाहत्यांसाठी ‘द फॅमिली मॅन 3’बाबत मोठी बातमी; मनोज वाजपेयी म्हणाला, “या वर्षाच्या शेवटी…”

मुंबई | Manoj Bajpayee – ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या वेबसीरिजे दोन्ही सीझन चांगलेच गाजले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच या सीरिजचा मुख्य अभिनेता मनोज वाजपेयीनं (Manoj Bajpayee) या सीरिजच्या तिसऱ्या सीझनबद्दल माहिती दिली आहे.
मनोजनं ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man 3) बद्दल सांगितलं की, “आज सकाळी एक चिमणी उडत माझ्या खिडकीवर येऊन बसली. ती आम्हाला म्हणाली, ‘द फॅमिली मॅन’च्या शूटिंगला या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 2023 मध्ये सुरुवात होणार आहे. तसंच जर पैसे वाचले तर रिलीजही करू. सर्वकाही ठिक होईल”. त्यामुळे आता प्रेक्षकांना या सीरिजच्या तिसऱ्या सिझनबाबत उत्सुकता लागली आहे.
‘द फॅमिली मॅन 3’ची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. तर मनोज वायपेयी, शारीब हाशमी, प्रियामणी आणि श्रेया धनवंतरी हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.