अर्थक्राईमताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्र

आर्थिक साक्षरतेची लढाई खूप मोठी : सुचेता दलाल

भारतात आजही अनेक आर्थिक घोटाळे सर्रासपणे होत आहेत. आपल्याकडील नियामक मंडळ हे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. त्याचबरोबर याबाबत नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्येही कमालीची उदासीनता दिसून येते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची लढाई अजून बरीच मोठी आहे, असे मत पत्रकार आणि लेखिका सुचेता दलाल यांनी व्यक्त केले.

पुणे ः मनोविकास प्रकाशन संस्थेतर्फे हर्षद मेहता पासून केतन पारेख पर्यंतच्या आर्थिक घोटाळ्यांची पोलखोल करणार्‍या ‘द स्कॅम’ या पत्रकार देबाशिष बसू, सुचेता दलाल लिखित आणि अतुल कहाते, पूनम छत्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या आठवड्यात नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे झाले.

यावेळी कहाते यांनी पुस्तकाच्या दोन्ही लेखकांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर, रीना पाटकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, सनदी अधिकारी दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक महावीर जोंधळे, डॉ. रवींद्र तांबोळी, लेखिका निलांबरी जोशी, दीपा देशमुख आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

दलाल म्हणाल्या, आर्थिक घोटाळे, फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात आपली न्यायव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आजही आर्थिक गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये वर्षानुवर्षे नागरिकांना न्याय मिळत नाही. इतकेच नव्हे तर सध्याच्या लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्येही वाणिज्य विषयात रस नाही. संसदेत याविषयी कोणतीही चर्चा घडत नाही. प्रश्नांना चुकीची उत्तरे दिली जातात. उत्तम अर्थव्यवस्था बनण्यासाठी आधी आपण वाणिज्य विषयात काम करणे गरजेचे आहे.’’

बसू म्हणाले, आपल्याकडे आर्थिक फसवणुकीसाठी ग्राहकाला दोषी मानले जाते. हा एक संघटनात्मक दोष आहे. आर्थिक घडामोडींवर देखरेख करण्यासाठी व्यवस्था आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी यंत्रणा आहे. मात्र असे असतानाही फसवणुकीचा सर्व दोष हा केवळ ग्राहकावर टाकला जातो आणि मग त्याला नुकसान भरपाईसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. हे अत्यंत चुकीचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये