प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनेक समस्या

कोथरूड : कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १६ मध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये कर्नाटक हायस्कूल ते पौड फाटा ब्रिज या भागात संध्याकाळच्या वेळी पथदिवे लावलेले नसतात, त्यामुळे नागरिकांना अंधारात वाट चालावी लागत आहे. त्या भागात मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. तिथे एक बँक आहे. दिवे नसल्यामुळे तिथे चोर्या होण्याची शक्यता आहे. त्या रस्त्यावर बेकायदेशीर किंवा विचित्र पद्धतीने वाहने पार्किंग करण्यात येतात, त्यामुळे तिथे वाहतूककोंडी होते.
तिथे हॉस्पिटल आहे, त्यामुळे तेथे वाहतूककोंडी झाल्यास रुग्णवाहिकेला येण्या-जाण्यास अडचण निर्माण होते. तसेच या रस्त्याला एकही स्पीडब्रेकर नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे उपाध्यक्ष तन्मय मेमाणे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर्वेनगर येथील क्षेत्रीय कार्यालयातील आयुक्त राजेश गुर्रम यांना तन्मय मेमाणे यांनी निवेदन दिले. या निवेदनाद्वारे लवकरात लवकर दखल घेतली जावी व येथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.