क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दगडफेकीत अनेक महिला जखमी..

जालना : (Marathi Arakshan Andolan) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना घेण्यासाठी पोलिस आले असता, उपोषणस्थळी नागरिक अन् पोलिसांत मोठा राडा झाला असल्याची माहिती राज्यभर वाऱ्यासारखी पसरत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, बाचाबाचीने रुपांतर हाणामारीत झाले, त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली असता, पोलिसांनी त्यांच्यावर लाठी चार्ज केला. त्यामुळे या राड्यात गावातील अनेक नागरिक जखमी झाले असून पोलिसांना देखील मार लागला आहे.

या सर्व परिस्थितीमुळे गावातील वातावरण सध्या तणावपूर्ण पाहायला मिळत आहे. या सर्व घटनेमुळे अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला गालबोट लागलं आहे.

या सर्व घटनेची माहिती मिळतात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलीस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये