उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई | Ajit Pawar Corona Positive – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच लक्षणं दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करण्याचं देखील आवाहन त्यांनी केलं आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत म्हटलं आहे की, “काल मी करोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी.”
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रुग्णालयातून डीस्चार्ज मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत.