ताज्या बातम्यामनोरंजन

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘वेड’ चित्रपटाचं येणार नवीन व्हर्जन ! रितेशने सांगितले कारण

मुंबई | अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या रितेश देशमुखच्या (Ritesh Deshmukh) ‘वेड’ सिनेमानं ( Ved movie ) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवलाय. दुसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ ( Ved movie ) चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी वाटचाल करत असताना रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

रितेश देशमुखने इन्टाग्राम लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आभार मानले. याबरोबरच रितेशने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा देखील केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 20 जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘वेड’ चित्रपटातील एडिट केलेलं काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याच रितेशने सांगितलं. याबरेबरच श्रावणी व सत्याचं एक रोमॅंटिक गाणंही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच चित्रपटाच्या शेवटी दिसणारं सलमान ( Salman Khan ) खान व रितेश देशमुखच गाणंही चित्रपटाच्या या नवीन व्हर्जनमध्ये दाखविण्यात येणार असल्याच त्याने सांगितलं. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटात हे बदल केले असल्याचं, रितेशने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये