ताज्या बातम्यादेश - विदेश
धक्कादायक! इराकमधील मॅरेज हॉलमध्ये आग; 100 जणांचा मृत्यू, 150 हून अधिक जखमी

Iraq Fire | इराकमधून (Iraq) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराकमधील एका मॅरेज हॉलला भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच वधू-वरही जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, इराकच्या निनेवेह प्रांतातील हमदानिया भागात ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मॅरेज हॉलला आग लागल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. आग लागली तेव्हा सुमारे एक हजार लोक येथे उपस्थित होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. लग्नमंडप पूर्णपणे मोडकळीस आला आहे. बचाव पथक येथून मृतदेह बाहेर काढत आहे.