‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चा विजेता ठरला ‘हा’ स्पर्धक, महाअंतिम सोहळ्यापूर्वीच फोटो होतोय व्हायरल

मुंबई | Master Chef Of India 7 Winner – ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ (Master Chef Of India 7) हा लोकप्रिय शो आहे. सध्या या शोचा सातवा सीझन सुरू आहे. हा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ सीझन सातचा विजेता (Master Chef Of India Winner) कोण होणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. मात्र, आता या शोच्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
सोनी टीव्हीवरील ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ या शोचे रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना हे तीन प्रसिद्ध शेफ परीक्षक आहेत. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाच्या फायनलला काही आठवडेच शिल्लक आहेत. अशातच या शोचा विजेता प्रेक्षकांना समजला आहे. हा विजेता दुसरा तिसरा कोणी नसून नयनज्योती (Nayanjyoti) हा आहे. नयनज्योतीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये नयनज्योतीनं ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ची सातव्या पर्वाची ट्रॉफी हातात घेतली आहे. तसंच विजेत्याला मिळणारा गोल्डन कोटही त्यानं परिधान केल्याचं फोटोत दिसत आहे. नयनज्योतीचा हा फोटो ट्विटरवरील एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. “शेवट चांगला झाला. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नयनज्योतीनं नाव कोरलं”, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. नयनज्योतीचे हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.