एमसी स्टॅनवर पुन्हा एकदा झाला हल्ला, व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | Mc Stan Concert – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) चा विजेता एमसी स्टॅन (Mc Stan) चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्याचे देशभरातील विविध शहरांमध्ये काॅन्सर्ट होत आहेत. त्याच्या या काॅन्सर्टला (Concert) चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, काही काॅन्सर्टमध्ये त्याला विरोध केला जात आहे. त्याच्या गाण्यांमध्ये अपशब्द वापरल्यानं काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. अशातच आता एमसी स्टॅनवर हल्ला झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
एका कार्यक्रमातून बाहेर पडताना एमसी स्टॅनवर हल्ला झाला आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्टॅन त्याच्या सुरक्षा रक्षकांसह गर्दीतून बाहेर पडत आहे. यावेळी अनेक चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याच्यावर हल्ला होतो. त्यानंतर स्टॅन कोणावर तरी ओरडताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दरम्यान, स्टॅनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी कमेंट करत आपला राग व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी स्टॅनवर टीका केली आहे. कारण व्हिडीओत स्टॅन शिव्या देताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय.