निघोजच्या रांजणखळग्यांची आठवण

सुशील दुधाणे
पुलाची लांबी मात्र ८० ते ९० फूट असावी. आपण चारचाकी ठिकाणी आलात तर आपले वाहन या ठिकाणी पार्क करून खाली उतरावे. या ठिकाणी इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी नदीच्या या पात्रा कुंड आहे. कुंड पाहण्यासारखे आहे. या ठिकाणच्या पात्रातील अद्भूूत किमया पाहायला मिळते. ते म्हणजे रांजणखळगे, हे पाहिले की आपणाला निघोज येथील रांजणखळग्याची आठवण होते. ते ज्याप्रमाणे रांजणखळगे आहेत, अगदी त्याचप्रमाणे येथेही आहेत.
रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाआड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहत येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणार्या घर्षणाने, मृदू खडक झिजन कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात. या ठिकाणी मोठे कुंड आहे. इंद्रायणी नदीचे पाणी या कुंडाच्या ज्या ठिकाणी पडून खाली जाते, तेथे एक धबधबा तयार झाला आहे. हा छोटा धबधबा खूपच आकर्षक दिसतो. हा अद्भूूत नजारा पाहण्यासारखा आहे.
पूल उतरून पुढे डाव्या बाजूला कुंड देवीचे मंदिर आहे. मंदिर साधारणत: चार ते पाच वर्षापूर्वी बांधले आहे. हे नवीन मंदिर बांधण्याच्या अगोदरपासून येथे प्राचीन मंदिर होते. हे मंदिर बांधण्याच्या अगोदर या ठिकाणी कुंड मातेचे छोटेसे मंदिर होते. या येथील कुंड मातेची एक आख्यायिका म्हणा अथवा ऐकीव माहिती अशी आहे. या ठिकाणी ज्या वेळेस गोर्या लोकांचे म्हणजे इंग्रजांचे राज्य होते, त्या वेळी या नदीच्या पात्रातील भागात तंबू टाकून ते राहत असायचे.
एके दिवशी या भागातून कुंड देवी जात असताना, गोर्या लोकांनी तिला या नदीच्या पात्रात ढकलून दिले होते. कालांतराने येथील एका अधिकार स्वप्नात देवी आली व तिने सांगितले की, मला या नदीच्या पात्रातून काढ व माझे मंदिर येथे बांधा. त्याप्रमाणे या ठिकाणी छोटे मंदिर बांधले गेले. नंतर या ठिकाणी स्थानिक लोकांनी मोठे मंदिर बांधले आहे.