सलमान खानचा मोठा निर्णय! टायगर-3 ‘ईद’ ला नाही, तर ‘या’ सणाच्या दिवशी होणार रिलीज…

मुंबई : (Salman Khan postponed release date of Tiger-3) दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं आपल्या टायगर-3 फिल्म रिलीज होणारी तारीख बदलल्याची घोषणा केली आहे. ‘टायगर 3’ 2023 च्या एप्रिल मध्ये मुस्लिमांच्या सणादिवशी रिलीज होणार होता. मात्र, आता या सिनेमाची रिलीज तारिख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सलमान खानने ‘टायगर 3’ चा नवा लूक शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. ‘टायगर 3’ हि फिल्म आता पुढील वर्षी दिवाळीला रिलीज केला जाणार आहे. टायगर फ्रॅंचायजीच्या तिसऱ्या भागात सलमान खानसोबत कतरिना कैफ, इमराम दिसणार आहे. दोघांच्या या जोडीला प्रेक्षकांनीही भरपूर पसंत केलं आहे. तर इमरान हाशमी खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे अनेक प्रक्षेकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान ईदच्या दिवशीच आपले सिनेमे रिलीज करण्याचा त्यानं पायंडा पाडला होता. यावर्षी लोकांना आशा होती की, सलमान नक्कीच ईदला आपल्या सिनेमाचं सरप्राईज देईल पण त्यानं आपल्या प्रेक्षकांना नाराजच केलं आहे.