ताज्या बातम्यादेश - विदेश

चंद्रानंतर सुर्याला गवसणी; मिशन आदित्य एल1 चा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार लाँचीग..

Mission Aditya L1 ISRO : काही दिवसांपुर्वीच भारताने चंद्रावर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. आता अपेक्षा आणखीन उंचावल्या असून, इस्रोने आता एका नव्या मैलाच्या दगडाकडे पाऊल टाकले आहे. आज ISRO ने जाहीर केले आहे की, ते 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 मिशन लाँच करेल. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित होईल.

लॉन्चिंग पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही नोंदणी करू शकतात. गॅलरीत बसून प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक देखील जाहीर केली आहे. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम असणार आहे.

या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल. ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताची मान आणखीनच उंचावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये