इतरटेक गॅझेटताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

मुकेश अंबानींची Jio AirFiber बाबत मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Jio AirFiber | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी Jio AirFiber बाबत मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जियो युजर्स Jio AirFiber ची आतुरतेनं वाट पाहत होते. तर आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी याबाबत मोठी घोषणा केली. जियो एअर फायबर गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच 19 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे.

जियो एअर फायबर 5G अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान आणि नेटवर्क वापरून कार्यालयांना, घरांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. तसंच जियो एअर फायबरसाठी दररोज 150,000 कनेक्शन दिले जाऊ शकते. सोबत गणेश चतुर्थीच्या दिवशी जियो एअर फायबर लॉन्च होणार असल्याची माहिती मुकेश अंबानींनी दिली.

जियो 5G भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे. तसंच जिओसाठी कंपनीचं एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. तर जगातील कोणत्याही कंपनीद्वारे जियो 5G चं रोलआउट सर्वात वेगवान असल्याचंही, मुकेश अंबानींनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये