ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मिशन अयोध्या’;…म्हणून आदित्य ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर

मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. आता मे महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आखला जाईल अशी माहिती मिळत आहे. 

गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन आणि निर्माण कार्य सुरु झाल्यापासून शिवसेना नेत्याचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोण असेल याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत यासंदर्भात चर्चा केली. या दौऱ्याच्या नियोजनाबाबतची बैठक संजय राऊत यांनी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये