ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईत दाखल

मुंबई | Sanjay Shirsat – शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी (17 ऑक्टोबर) रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर शिरसाट यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज (18 ऑक्टोबर) सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आलं. तसंच सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संजय शिरसाठ यांना काल रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. तसंच आता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, संजय शिरसाट हे औरंगाबाद येथील आमदार आहेत. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा 40 हजार 747 मतांनी पराभव केला होता. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये