ताज्या बातम्यामनोरंजन

राज ठाकरेंनी काढलं अजित पवारांच व्यंगचित्र; पुढे म्हणतात, गप बसा आता…

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव 2023चे उद्घाटन झाले. राज ठाकरे हे स्वत: व्यंगचित्रकारही असून त्यांनी याआधी अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले आहेत. पुण्यात व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह उपस्थितांनी केला. तेव्हा सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले आणि मिश्किल टिप्पणीसुद्धा केली.

राज ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काही मिनिटात काढले. राज्यात जे सुरू आहे ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच व्यंगचित्र काढून झाल्यावर आग्रह करणाऱ्यांना मिश्किलपणे आता गप्प बसा असं म्हणताच तिथे एकच हशा पिकला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मी पुण्यावरून रत्नागिरीला जाणार होतो. पण आज जात असताना माझे मित्र चारुदास पंडित याने मला मध्येच टोल भरायला लावला आहे.जागतिक व्यंगचित्र दिवस म्हटल्यावर आज येणं स्वाभाविक होते. इथे जगभरातील व्यंगचित्र असून ते आज मी इथ आल्यावर पाहत होतो.व्यंगचित्र पाहिलं की माझे हात शिवशिवतात, पण वेळ आणि बैठक न भेटत असल्याने ती व्यंगचित्र माझ्या भाषणातून पुढे येतात. त्या दिवशी मला कोणीतरी प्रश्न विचारलं की राजकारण की व्यंगचित्र तर मी म्हणालो की व्यंगचित्र कारण मी व्यंगचित्रांमध्ये रमणारा माणूस आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये