ठरलेल्या तारखेला ‘मनसैनिक’ अयोध्येत! तिथून दिला थेट इशारा!

अयोध्या : (MNS Leader On Ayodhya Tours)आज अयोध्येत दाखल झालेले मनसे नेते आणि ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तेथूनच फेसबुक लाईव्ह करून आपण अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर लाईव्हमध्ये ते म्हणाले, मराठी माणसाला चँलेज करायचे नाही, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून म्हणजे आज अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यात प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला. परंतु, अविनाश जाधव यांनी काही कार्यकर्त्यांसोबत अयोध्येत जाऊल श्रीरामाचे दर्शन घेतले आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या दौरा रद्द केला, पण सैनिकांनी तो पूर्ण केला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वाभिमान जपला. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करतोच. मराठी माणसाला कोणीही चँलेज करायचे नाही. राज ठाकरे ज्यादिवशी आदेश देतील त्या दिवशी या सर्वांना यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्हमधून दिला आहे.