क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पहिल्या टेस्टमध्ये सामनावीर! मात्र दुसऱ्या सामन्यात कुलदीप पत्ता कट, निवड समितीवर फॅन्स भडकले…

ढाका : (Ind Vs Bang 2nd Test match 1st day 2022) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सध्या ढाका (Dhaka) येथे सुरु दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने (Team India) अंतिम 11 मध्ये एक मोठा बदल केला आहे. संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuledeep Yadav) जागी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydve Unadkat) स्थान दिलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीवर बांगलादेशाच्या एकूण 8 गोलंदाजांना माघारी पाठवलं. त्यामुळे भारतीय संघाचा विजयी मार्ग सुकर झाला. अशा परिस्थितीत कुलदीपला प्लेईंग-11 मधून वगळणं भारतीय चाहत्यांना पसंत आलेलं दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

कुलदीप यादवने याआधी अनेक वेळा भारतीय संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तरी तो सतत संघात आत-बाहेर होताना दिसतो. त्यामुळे एक दमदार गोलंदाज असूनही टीम इंडिया नियमितपणे प्लेईंग-11 मध्ये त्याचा समावेश का करत नाही, असा संतप्त सवाल चाहते विचारत आहेत. मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर विकेटही फिरकीपटूसाठी अनुकूल आहे. अशा परिस्थितीत स्पिनरऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णयामुळे चाहते नाराज झाले असून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात निवड समितीला काही वेगळा निर्णय घ्यावा लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये