तब्बल 993 वर्षांनंतर हा योग ! चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ
Moon Closest To Earth | शनिवारी 21 जानेवारी 2023 रोजी तब्बल 993 वर्षानंतर असा योग जुळून आला होता. यावर्षी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. याआधी ही खगोलीय घटना 1030 साली घडली होती. आता हा दुर्मिळ योग 345 वर्षांनी दिसणार आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. शनिवारी हा दुर्मिळ योग होता, पण अमावस्येमुळे आपण ही सुंदर खगोलीय घटना पाहण्यापासून मुकलो आहे.
आता 345 वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार चंद्र
993 वर्षांनंतर अशी भौगोलिक घटना घडली आहे, जी दुर्दैवाने आपल्याला पाहता आली नाही. 993 वर्षांनंतर शनिवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. तर रविवारी म्हणजे, आज शुक्र आणि शनि चंद्राच्या अगदी जवळ असतील आणि हे उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येणार आहे. 22 जानेवारीला म्हणजेच आज शुक्र आणि शनि चंद्राच्या खूप जवळ येणार आहे. खगोलीय घटनेनुसार हे दोन्ही ग्रह एका रेषेत म्हणजेच एकामागे एक दिसतील. हा दुर्मिळ योग संयोग दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.