“पुढच्या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवं”

मुंबई | Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis – सध्या भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य चर्चेत आहे. ‘आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनीच नेतृत्व केलं पाहिजे’, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे की, “पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, असा काही जणांनी येथे उल्लेख केला. पण कर्तृत्ववान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठिशी उभे राहिले. मला त्यांनी उर्जा दिली. आज आपले कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवं. मी जबाबदारीने सांगतो की जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन एक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सलामच करायला पाहिजे. जेव्हा माझे तिकीट कापले तेव्हा वाटलं नव्हतं की, परत मी आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष होईल म्हणून पण मला मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली.”
पुढे बावनकुळे म्हणाले, 1992 मध्ये मी कुऱ्हाडी गावाचा शाखाध्यक्ष होतो आणि कधी वाटलंही नव्हतं की प्रदेशाध्यक्ष होईल. तेव्हा खूप संघर्ष होता, प्रचंड ताणतणाव होता. मला अभिमान आहे की पक्षाने मला आमदार, पालकमंत्रीही केले. आज जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. 155 देशांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले. देशाच्या पंतप्रधानांचा इतिहास बघा, चहावाला होते एका गावात. युगपुरुष होतील असं त्यांचे कर्तृत्व आहे. ते म्हणाले, जगातले 70 टक्के देश म्हातारे होणार. संस्कार, संस्कृती असणारा असा आपला देश, युवापिढीचे नेतृत्व करणार आहे. मला ही जाणीव आहे की मला प्रदेशाध्यक्ष केलं म्हणजे माझ्यावर जबाबदारी खूप आहे. 45 प्लस खासदार आम्हाला द्यावे लागतील महाराष्ट्रातून. कोरोना काळात खूप मोठं काम केलं, लस आणली. तुमच्या आमच्या तोंडावरचे मास्क काढण्याचं काम मोदींनी केलं. मी या दोन महिन्यात महाराष्ट्रात फिरणार आहे. दीड तास मी समाजासाठी राखीव ठेवलाय.