शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईनं केला मोठा खुलासा; म्हणाल्या, “तो त्याच मुलीबरोबर…”
मुंबई | Shiv Thackeray – सध्या ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व चांगलंच चर्चेत आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरेनं (Shiv Thakare) त्याच्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच सध्या चर्चेत असेलला शिव त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे.
‘बिग बाॅस मराठी’च्या घरामध्ये शिव व वीणा यांचं रिलेशनशिप चांगलंच चर्चेत होतं. मात्र, आता त्यांच्या रिलेशनशिपचा दि एण्ड झाला आहे. तसंच शिव आता कोणाला डेट करत आहे का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तसंच नुकतंच त्याच्या आईनं त्याच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.
शिवच्या आईला ‘टेली खजाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिवची आई म्हणाली की, “आत्ता तरी त्याचं कोणतंच रिलेशनशिप नाही. सगळं बंद आहे, मी स्वतः आधी करिअरवर लक्ष केंद्रित करणार. त्यानंतर मी लग्नाचा विचार करेन असं शिव म्हणतो.”
“त्याच्यासाठी मी अमरावतीमधील मुलगी शोधणार आहे. तसंच त्या मुलीनं मला आणि शिवच्या वडिलांना सांभाळलं नाही तरी चालेल. पण त्या दोघांचं पटलं पाहिजे अशी मुलगी मी त्याच्यासाठी शोधणार आहे. मी समजूतदार मुलगी शोधणार आहे. बाकी तो कोणत्याच मुलीबरोबर लग्न करणार नाही. अमरावतीमध्ये तर शिवसाठी मुलींच्या रांगाच लागतात”, असंही शिवच्या आईनं यावेळी सांगितलं.
One Comment