“पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा”- मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

मुंबई : (CM Eknath Shinde On Rain Order) भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा दिलेला इशारा दिला होता. त्याप्रमाणे सध्या कोकणात पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्चभुमीवर काही जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफच्या जवानांनासह इतर बचाव पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
दरम्यान, सोमवार दि. ४ रोजी दुपारनंतर कोकणातील चिपळून परिसरात पावसाचा ओघ वाढत गेला. त्यासह रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे पाण्याची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या वेळीच सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कुंडलिका नदिनं धोक्याची पातळी ओलांडली असून, त्यासह अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांनी पाणी पातळी ओलांडल्याच्या उंबरट्यावर आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागांना सावध राहून खबरदारीचे निर्देश दिले आहेत.