मोठी बातमी : UPSC पाठोपाठ MPSC चाही निकाल जाहीर; 200 पदांवर…

MPSC Result | युपीएससी (UPSC) पाठोपाठ आता एमपीएससी मुख्य परीक्षेचाही निकाल मंगळवारी जाहीर (MPSC Result) झाला आहे. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2020 चा (MPSC Mains 2022) निकाल जाहीर झाल्याचे राज्य लोकसेवा आयोगाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 200 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.
या परीक्षेत प्रमोद बालासो चौघुले (Pramod Balaso Chaughule) राज्यातून पहिले आले आहेत. तर महिलांमधून रुपाली गणपत माने (Rupali Ganapat Mane) या प्रथम क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर गिरीश विजयकुमार पारेकर (Girish Vijaykumar Parekar) हे मागासवर्ग उमेद्वारांतून पहिल्या स्थानावर आहेत. या परीक्षेची गुणवत्ता यादी 29 एप्रिल 2022 दिवशी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.
वरील निकालासोबतच एमपीएससीच्या सिविल इंजिनिअरिंगचाही (MPSC Civil Engineering) निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या यादीमध्ये रोहित कट्टे (Rohit Katte) यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
सोमवारी युपीएससी 2021 च्या परीक्षेचा (UPSC 2021 Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात श्रुती शर्मा (Shruti Sharma) यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले होते. यावर्षी युपीएससीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिलांनीच बाजी मारली असल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.