Top 5क्राईमताज्या बातम्यापुणेशिक्षण

MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याने खळबळ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क (MPSC Group B And C Hall Tickets) संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक (Telegram) रविवारी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे एमपीएससीकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे. (MPSC Students Hall Ticket Leak on Telegram)

हा केवळ नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आल्याचे समजते.

एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक व्हायरल होत असल्याची दखल एमपीएससीकडून घेण्यात आली. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे.

एमपीएससीबाबत झालेला प्रकार चिंताव्यक्त करणारा व आयोगाच्या कारभारवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कारण विद्यार्थ्याकडुन कोणतेही आंदोलने केली, वातावरण निर्मिती केली तर विद्यार्थ्यांवर कार्यवाही तात्काळ आयोग करते. दबाब टाकण्याचा प्रयत्न करु नका, असे सांगते. अशा विद्यार्थ्यांना परीक्षातून बाद केले असे सुचना देते. आता काय? यांची नैतिक जबाबदारी घेउन आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार का? या प्रकाराची गंभीर प्रकारे चौकशी व्हावी. उच्चस्तरीय समिती नेमावी. नक्कीच यात काहीतरी काळंबेरे आहे.
– कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड्स

दरम्यान टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्य लिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली. तसेच या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा किंवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये