मुकेश अंबानी झाले आजोबा! ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म
मुंबई : (Mukesh Ambani became a grandfather) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा बनले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे नाव देखील जाहीर करण्यात आली आहेत.
ईशाचे लग्न उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा, आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबात आज आनंदाचा दिवस आहे. ईशा आणि तिची नावजात बालक दोन्ही मुले निरोगी आहेत. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. ईशा आणि आनंद 12 डिसेंबर 2018 रोजी लग्नाच्या रेशीम गाठीत अडकले. त्यानंतर आता ईशाने दोन मुलांना जन्म दिल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.