शाहरूखसाठी कायपण! चाहत्यांनी केला आता ‘पठाण हेअरकट’, एकदा व्हिडीओ बघाच

मुंबई | Pathaan – गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तसंच आज (25 जानेवारी) बहुप्रतिक्षीत पठाण सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी शाहरूखचे चाहते चांगलेच आतूर झाले होते. सध्या संपूर्ण देशभरात पठाण (Pathaan) चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून (Pathaan Advanced Booking) 24 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवरील (Box Office) अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शाहरूखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर ‘पठाण’ पाहण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. तसंच काही ठिकाणी तर चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडण्यात आले आहेत. यातून एकच दिसून येत आहे ते म्हणजे शाहरूखवर चाहत्यांचं असलेलं प्रेम. चाहते शाहरूखसाठी काहीही करायला नेहमी तयार असतात. अशातच आता शाहरूखच्या चाहत्यांनी चक्क ‘पठाण हेअरकट’ केला आहे. या पठाण हेअरकटचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शाहरूखनं बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच आनंदी झाले असून ते मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन करत आहेत. चाहत्यांनी शाहरुखवर आपलं किती प्रेम आहे हे दाखवून दिलं आहे.
शाहरूखच्या चाहत्यांनी पठाण हेअरकट केला आहे. त्यांनी केसांमध्ये पठाण हे नाव कोरलं आहे. या तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच ‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे.