ललित पाटील याला घेऊन पोलीस गुप्तपणे नाशिकमध्ये, घरासह ड्रग्ज फॅक्टरीची झाडाझडती; काय आहे कारण ?
Lalit Patil :
ड्रग्स माफिया ललित पाटील यांच्या पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. चार दिवसांपूर्वी त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलीस त्याला गुप्तपणे नाशिकमध्ये घेऊन आले. पोलीस अचानक नाशिकमध्ये आले होते. ड्रग्स माफिया ललित पाटील याला चार दिवसांपूर्वी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. उद्या ललित पाटील याची कोठडी संपत आहे. त्यापूर्वीच पोलीस त्याला अचानक नाशिकमध्ये घेऊन जाण्यात आले. यावेळी कुणालाच खबर नसताना पोलिसांनी अचानक ललित पाटीलला (Lalit Patil) घेऊन आले आणि त्याची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे.
ललितने ड्रग्सच्या पैशातून आठ किलो सोने खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याने ज्या ज्या सराफांकडून सोनं खरेदी केलं, ते सर्व सराफ पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचीही पोलीस कसून चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तब्बल 15 ते 20 मिनिटे पोलीस या कारखान्यात होते. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन नाशिककडे रवाना झाले. नाशिकच्या उपनगरात ललितचं घर आहे. त्याच्या घरी त्याला पोलीस घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. पण पोलीस नाशिक उपनगरात गेली. पण त्याच्या घरी पोलीस गेले नाहीत. नाशिकमध्ये त्याच्या ज्या ठिकाणी मालमत्ता होत्या, त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार असल्याचीही चर्चा होती. पण पोलीस थेट मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
पोलीस ललित पाटील (Lalit Patil)याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. कारण ललितच्या ड्रग्सच्या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.