मनपाला दुधाने कुटुंबीयांकडून १३ गुंठे जमीन हस्तांतरित

पुणे : सिंहगड रस्त्यावर वाढता वाहतुकीचा ताण लक्षात घेता यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक होते. यासाठी दुधाने कुटुंबीयांकडून महानगरपालिकेला तब्बल १३ गुंठे जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जागा आणि आपण वेळोवेळी केलेला पाठपुरावा यामुळे लवकरच उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
या पुलामुळे सिंहगड रस्ता व कर्वेनगरमधील वाहतूक कोंडी कमी होणार असून, भविष्यातील अनेक दशके पुणेकरांच्या वाहतुकीच्या प्रश्नाचे कायमस्वरूपी निराकरण होणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी व्यक्त केले.
सध्या पुणे मनपामध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासक म्हणून मा. आयुक्त काम पाहत आहेत. त्यांनी येत्या दोन वर्षांच्या अंदाजपत्रकात पुलासाठी तब्बल ५१ कोटी रुपयांची तरतूद केली असून, या उपक्रमाचे काम युद्धपातळीवर करण्यात येईल, यात शंकाच नाही. नागरिकांच्या सेवार्थ आम्ही सतत केलेल्या पाठपुराव्यास यश येत आहे.