पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स
कोथरुड मैत्री व्यासपीठाच्या प्रत्येक उपक्रमाला माझी साथ

कोथरूड : कोथरूड मधील सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मैत्रीचा अतूट धागा म्हणजे कोथरूड मैत्री व्यासपीठ आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून माझा सन्मान म्हणजे घरच्या लोकांनी केलेला सन्मान आहे. घरच्या लोकांनी केलेल्या सन्मानामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल अशा भावना माजी महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मोहोळ यांचा मैत्री व्यासपीठाच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. मोहोळ म्हणाले, पक्षीय वैचारिक मत भेद असतात पण सर्वजण या व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र येत खेळी मेळीच्या वातावरणात संवाद साधतात ही एक चांगली आणि आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. कोथरुड मैत्री व्यासपीठाच्या प्रत्येक उपक्रमाला माझी साथ असणार आहे.