गुगल सहसंस्थापकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याच्या दाव्याचे मस्क कडून खंडन

Elon Musk : टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच्या त्यांनी ट्विटर खरेदीची डील कॅन्सल करण्याच्या प्रकरणावरून ते चर्चेत होते. तर सध्या गूगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांच्या पत्नी निकोल शानाहान यांच्याशी टेस्ला यांचे प्रेमसंबंध असल्याच्या दाव्यामुळे ते चर्चेत आहेत. मात्र, त्यांचे निकोल सोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.
सोमवारी सकाळी त्यांनी ट्वीट करून त्यांचे सर्जीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंधाचे दावे फेटाळून लावले आहेत. ट्वीट मध्ये ते म्हणाले, ‘सर्जी आणि मी मित्र आहोत. कालच्या रात्रीच आम्ही एका पार्टीत सोबत होतो. सर्जीची पत्नी निकोलाला मी मागील तीन वर्षांत फक्त दोनदा पहिले आहे. तेही लोकांमध्ये असताना. आम्ही कधीही एकत्रित आलेलो नाहीत आणि रोमँटिक होण्याचा देखील काही प्रश्न नाही’ असं स्पष्टपणे मास्क यांनी सांगितलं आहे.