ताज्या बातम्यारणधुमाळी

“काँग्रेसमध्ये या आम्ही तुम्हाला…”, नाना पटोलेंची नितीन गडकरींना ऑफर!

मुंबई | Nana Patole Gave Offer To Nitin Gadkari – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.  “नितीन गडकरींनी भाजपमध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, त्यांना आम्ही साथ देऊ” असं नाना पटोले यांनी अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपमध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते, असंही नाना पटोले म्हणाले. तसंच देशात भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या टी-शर्टच्या किंमतीवरुन पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपला धडकी भरली आहे. त्यामुळेच टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागत आहे”, असं पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये