ताज्या बातम्यारणधुमाळी

“अमित शाह यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”

मुंबई | Nana Patole On Amit Shah Mumbai Visit – काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी आले आहेत, गणपतीने त्यांना सद्बुद्धी द्यावी. अमित शाहंनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपाची रणनीती ठरते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. सध्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीयेत, अरुणाचल प्रदेशात चीनने अतिक्रमण केलं आहे. लडाखमध्येही अतिक्रमण केलं आहे. ज्याप्रकारे चीन दररोज आपल्या देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत देशाच्या गृहमंत्र्यांची भूमिका काय असावी? हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे.”

देश सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली होती. देश असुरक्षित आहे, असं तेच म्हणाले होते. सध्या काश्मीरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. मागील कित्येक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. काँग्रेसच्या काळात जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ यायची, तेव्हा हीच भाजप घसा फाडून ओरडायची. याचा एकंदरीत अर्थ एवढाच आहे की, आरोप करणं सोपं असतं. पण देश चालवणं कठीण आहे. हे भाजपाला कळून चुकलंय”, असंही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये