“ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड”; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : (Nana Patole On Narendra Modi) सीआरपीएफच्या ४० जवानांचा बळी घेणाऱ्या पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी PM मोदींसह त्यांच्या सरकारबाबत अनेक गंभीर खुलासे केले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकावर टीका करताना मोदींची भूमिका देशासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे.
पटोले म्हणाले, “जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबतचा जो खुलासा केला आहे तो भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब घातक असून राष्ट्रद्रोह आहे. म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना याचं उत्तर द्याव लागेल. कारण ज्या पद्धतीनं पुलवामा घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाला, त्याच राजकारण करुन निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळं या विश्वासघातकी व्यवस्थेबाबत मोदींनी उत्तर द्यावं ही काँग्रेसची भूमिका आहे”
मलिक यांच्या या आरोपांमुळं देशाच्या जनतेच्या मनात मोदी सरकारबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळं त्यांनी उत्तर देणं भाग आहे. तसेच सत्यपाल मलिकांनी दुसरा मोठा गौप्यस्फोट जो केला आहे. त्यानुसार, राम माधव यांनी मलिक यांना जम्मू-काश्मीरमध्ये जी सुरक्षाविषयक कामं आहेत, त्यांना मंजुरी देण्यासाठी सह्या करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातही सुरक्षेत भाजपचं किती मोठा भ्रष्टाचार आहे. हे देखील यातून सिद्ध झालं आहे. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांना उत्तर द्यावं लागेल ही जनतेची आणि काँग्रेसची मागणी आहे.