ताज्या बातम्यारणधुमाळी

‘ही तर भाजपची पाॅलिसी…’, संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

अहमदनगर | Nana Patole On Sanjay Raut ED Action – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथकं आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं होतं. मात्र आता नऊ तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही तर भाजपची पॉलिसी’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

यावेळी नाना पटोले म्हणाले, मोदी सरकार, संवैधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या धोरणाच्या विरोधात जो बोलेल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई केली जाईल, असं धोरण राबवलं जात आहे.

इंग्रजांनी आणलेल्या धोरणांची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून केली जात आहे. ब्लॅकमेल करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली जात आहे. हे कोणापासूनही लपलेलं नाही. किती अत्याचार करायचा आहे, किती लोकांना तुरूंगात टाकायचे टाका. निवडणुकीत जनता अत्याचारी व्यवस्थेला जागा दाखवतील यात कोणतंही दुमत नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये