ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी; नाना पटोले म्हणाले, “घडलेला प्रकार चांगला नाही…”

मुंबई : (Nana Patole On Satyajeet Tambe) विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात (Graduates Constituency Election) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीचेही नाव जाहिर केलं नाही. तर काँग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्याचे घोषित केलं होतं. मात्र, ऐनवेळी पक्षाचा आदेश डावलून सुधीर तांबे यांनी माघार घेऊन ए.बी. फॉर्म अभावी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रतिक्रिया आली आहे.

नाना पटोले यांना सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत विचारलं असता ते म्हणाले की घडलेला प्रकार चांगला नाही. मात्र याबाबत काय घडलं याची माहिती घेऊन मी भूमिका स्पष्ट करणार आहे. सुधीर तांबे यांनी का माघार घेतली ही माहिती घ्यावी लागणार आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून तांबे कुटुंबाने एकप्रकारे काँग्रेसचा आदेश डावलला आहे. तर सत्यजीत तांबे खुद्द सहकार्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हणत आहे. अर्थातच भाजपला (BJP) देखील सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवार असल्यामुळे पाठिंबा देणं जड जाणार नाही. मात्र या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष बॅकफूट गेली का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये